नवी दिल्ली- बँक खात्यात मिनिमम बॅलन्स शिल्लक न ठेवल्यामुळे आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बँक ग्राहकांकडून तब्बल ५ हजार करोड रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले आहे. यात २१ सरकारी बँकेसोबतच ३ खाजगी बँकांचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानी ग्राहकांकडून मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे दंड वसूल केला आहे.
एसबीआयने २४३३.४७ कोटी रुपये दंड स्वरूपात ग्राहकांकडून वसूल केले आहे. जे इतर बँकेकडून वसूल केले गेलेल्या वसुलीचे ५० टक्के आहे. एसबीआयनंतर एचडीएफसी बँकेने ५९०.८४ कोटी, एक्सिस बँकेने ५३०.१२ कोटी, आयसीआयसीआय बँकेने ३७१.६० कोटी रुपये वसूल केले आहे.