नवी दिल्ली: भाजपाचे माजी खासदार उदित राज यांनी सुप्रीम कोर्टावर आरोप करत मतदान यंत्रावरून सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल होतात. व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करावी अशी मागणी होत आहे. मग सुप्रीम कोर्ट त्या मागणीवर का विचार करत नाही असा प्रश्न त्यांनी ट्वीटर द्वारे उपस्थित केला आहे. उदित राज यांना लोकसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे ते कॉंग्रेस पक्षात दाखल झाले आहे.
निवडणुकीसाठी सरकारी काम हे तीन महिन्यापर्यंत हळूवार चालतात. त्यात मतमोजणीला दोन-तीन दिवस लागले तर काय फरक पडतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपाने मतदान यंत्र बदलवले असतील, त्यासाठी निवडणूका सात टप्प्यात घेण्यात आल्या आहे. देशात लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा १९मे रोजी पार पडला. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून देशभरातील प्रसार माध्यमांनी एक्झिट पोल दाखवायला सुरुवात केली.
एक्झिट पोलमध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी इव्हीएम मशीनवर आरोप करत व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करावी अशी मागणी लाऊन धरली होती. काहींनी या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने विरोधी पक्षांना फटकारत एकच विषयावर किती वेळा सुनावणी करावी असा सवाल केला होता. निवडणूक आयोगाने पण इव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.