चिमुरडीच्या मृत्युनंतर डॉक्टरला मारहाण

0

नाशिक : भाजलेल्या एका 3 वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. तसेच हॉस्पिटलचे तोडफोड करत मोठे नुकसान केले आहे. गुलाबजाम बनविण्यासाठी तयार केलेल्या साखरेच्या गरम पाकाच्या पातेल्यात 3 वर्षाची चिमुरडी पडली. ती गंभीररित्या भाजल्याने तिला खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पंचवटीमधील हिरावाडीतील कालिकानगर येथील साईनाथ रो-हाउसमध्ये घडली़, स्वरा प्रवीण शिरोडे असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. हिरावाडीती साईनाथ रो-हाउस नंबर चारमध्ये शिरोडे कुटुंबीय राहत आहे, त्यांचा केटरिंग व्यवसाय आहे. ऑर्डरसाठी लागणारे गुलाबजाम बनविण्यासाठी एका पातेल्यात साखरेचा पाक तयार करण्यात आला होता. यावेळी तीन वर्षांची स्वरा ही खेळता-खेळता पातेल्याजवळ आली आणि गरम पाकाच्या पातेल्यात पडल्याने ती गंभीररीत्या भाजली.

चिमुरडीला उपचारासाठी प्रथम एका खासगी रुग्णालयात नेले मात्र, त्यांनी दाखल करून घेतले नाही. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारापूर्वीच अनामत रक्कम भरायला सांगितली, यानंतर नातेवाइकांनी बाहेरून औषधेही आणून दिली. यानंतर दुपारच्या सुमारास उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. यामुळे नातेवाइकांचा संताप झाला आणि त्यांनी उपचारातील हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, या रुग्णालयाची तोडफोड केली आहे.