बंगळूर- काँग्रेसने किमान उत्तर कर्नाटकात आढळणा-या मुधोल कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी असा सल्ला मोदींनी दिला. उत्तर कर्नाटकमध्ये आढळणा-या मुधोल कुत्र्यांचा नुकताच भारतीय लष्करामध्ये समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसने किमान कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी कर्नाटकच्या जामखंडी येथे काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर कर्नाटकात आढळणा-या मुधोल कुत्र्यांकडून काँग्रेसने देशभक्ती शिकावी असा सल्ला मोदींनी दिला.
उत्तर कर्नाटकमध्ये आढळणा-या मुधोल कुत्र्यांचा नुकताच भारतीय लष्करामध्ये समावेश करण्यात आला आहे. मुधोल कुत्रे म्हणजे शिकारी कुत्र्यांची एक जात आहे. भारतीय लष्करामध्ये सामील होणारी मुधोल ही भारतीय कुत्र्यांची पहिली प्रजाती आहे. उत्तर कर्नाटकच्या जामखंडी येथील बागलकोटमध्ये एका निवडणूक प्रचारसभेत मोदी बोलत होते
काँग्रेसचा दर्जा इतका खालावला आहे की, पक्षाचा एक नेता ‘भारत के टुकडे होंगे’ अशी नारेबाजी करणा-यांमध्ये गेला आणि त्यांना समर्थन दिलं असं मोदी म्हणाले. जेएनयूमधील देशविरोधी नारेबाजीच्या प्रकरणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जेएनयूच्या परिसरात गेले होते, त्यावरुन मोदींनी राहुल यांना हे खडेबोल सुनावले.