वाशिंगटन: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज होत आहे. काही तासांमध्ये राष्ट्राध्यक्ष कोण होणार? हे स्पष्ट होईल. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन निवडणुकीच्या रिंगणात आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत जो बायडन यांनी आघाडी घेतली होती मात्र पुन्हा ट्रम्पने आघाडी घेतली आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचे आरोप केले असून याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे. पत्रकार परिषद घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, तसेच या निवडणुकीत आपलाच विजय होईल असे ट्रम्प यांनी दावा केला आहे. मतमोजणी थांबवावी अशी मागणी ट्रम्प यांनी केली आहे. टपाली मतदानावर ट्रम्प यांचा आक्षेप आहे.
दुसरीकडे जो बायडन यांनीही कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे.