पाकिस्ताना ‘गाढवांचा देश

0

इस्लामाबाद – पाकिस्तानचा आर्थिक सर्वेक्षण अहवालात एक आश्चर्यचकीत बाब समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस गाढवांची संख्या वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानामध्ये वर्तमानस्थितीत ५३ लाख गाढव असल्याचा खुलासा या अहवालात करण्यात आल्याने पाक सध्या ‘गाढवांचा देश’ बनला आहे. या अहवालानुसार २०१६ मध्ये पाकमध्ये ५१ लाख गाढव होते. या गाढवांचा संख्या वाढून आता ५३ लाख झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशात गाढवांची वाढती संख्या पाहता पाकला गाढवांचा देश म्हणणे लोकांनी सुरू केले आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास ८० लाख लोक पशुपालनाचा व्यवसाय करतात. त्यांचा उत्त्पनांचा ३५ टक्के वाटा हा या व्यवसायातून येतो. गाढवांच्या व्यवसायामुळे ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन होत आहे. याशिवाय परदेशी चलन मिळवण्यासाठी सुद्धा गाढव महत्वाचे असल्याचेही पाक सरकारचे म्हणणे आहे.