पालघर समुद्रात संशयास्पद बोट

0

मुंबई : पालघर समुद्रात संशयास्पद बोट फिरतांना आढळली असून, सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागे काही दिवसांपुर्वी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब हल्ल्याप्रकरणी देशात सुरक्षा यंत्रणाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर समुद्रात आढळलेली बोट ही श्रीलंकेतून आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ही बोट आढळल्यामुळे तटरक्षक दलाने तात्काळ मच्छीमारांसोबत बैठक घेऊन त्यांना या बाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच समुद्रात काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे सांगण्यात आले आहे.