डॉ.दीपक पाटील यांना ‘राष्ट्रसेवा पुरस्कार’ 

0
समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची दखल
न्हावी, ता. यावल – येथून जवळच असलेल्या अंजाळे येथील मूळ निवासी व सध्या आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे खजिनदार असलेल्या डॉ.दीपक ऊर्फ ज्ञानेश्वर श्रीधर पाटील यांना ‘पद्मश्री मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2018’ देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक बांधीलकीची जाण व भान ठेवून समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे राष्ट्रीय लौकिकात भर घालून गांधीवादी रचनात्मक कार्य केल्याबद्दल डॉ. पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यांच्या उपस्थितीत देण्यात आला पुरस्कार
पुण्यातील सावित्रीबाई फुले सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.  पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान उरळी कांचनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे व उपाध्यक्ष डॉ. अशोक पाटील यांच्या हस्ते डॉ. दीपक पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्डियाक सर्जन डॉ. मनोज दुराईराज, कार्डिओलॉजिस्ट डॉ.प्रमोद नारखेडे, न्यूरोसर्जन डॉ.दीपक पाटील, भोरचे माजी नगराध्यक्ष डॉ.प्रदीप पाटील, नेवासा येथील डॉ.अशोक  शिंदे, टिटवाळा येथील लताश्री वडनेरे आदींची उपस्थिती होती.
सर्व क्षेत्रातील शुभेच्छांचा वर्षाव
डॉ.पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल नीळकंठ रामदास फिरके, मसाका चेअरमन शरद महाजन, अनिल लढे, प्रा.आर. वाय.पाटील, प्रा.एन.टी.तळेले, दिनकर चोपडे, सुरेश भोगे, प्रा.पी.एन.भिरूड, रमेश वारके, विजय पाटील, नरेंद्र पाटील, ज्ञानदेव बोरोले, संजय बोरोले, अशोक चौधरी, मुकुंदा भोळे, जगदीश भोळे, ललितकुमार फिरके, संगीता फिरके, दिलीप ढाके, एस. पी. पाटील, के. के. नेहेते, जे. बी. राणे, के. डी. पाटील, भरत फिरके, सुनिता पाचपांडे, डॉ. जगदीश पाटील आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.