डॉ. रविंद्र भोळे : डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई शांतीसेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायाचे उर्जास्रोत होते. महात्मा गांधीजींचे अखेरचे शिष्य डॉ. मणिभाई देसाई अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून निष्काम कर्मयोग ते जगले. ऐश्वर्य, यश व असामान्य सामर्थ्य प्राप्त असताना नीतिमूल्य जीवन जगून कर्मफलाने ते आसक्त झाले नाहीत; असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाज सेवक व प्रवचनकार डॉ. रविंद्र दि. भोळे यांनी काढले. मणिभाईची जयंती साजरी करणे म्हणजे विभूतीपूजा होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान उरुळी कांचन संस्थेच्यावतीने डॉ. मणिभाई जयंती निमित्ताने डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान कार्यक्रम व गांधीमेळावा सावित्रीबाई फुले स्मारक हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. भोळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक पाटील व डॉ. रविंद्र भोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. डॉ. ज्ञानेश्वर पाटील (देवाची आळंदी), डॉ. मनोज दुराईराज (कार्डिअॅक सर्जन), डॉ. दीपक पाटील (न्युरोसर्जन, पुणे); डॉ. प्रमोद नारखेडे (हृदयरोग तज्ज्ञ) डॉ. संदीप भिरुड (वैद्यकीय सेवा, पुणे) निनाद शिंगाडे (युवा ) अमितकुमार नाफडे (ग्रामीण विकास, मलकापूर) अॅड. प्रकाश खोडा (कायदेविषयक सल्ला) डॉ. जयसिंग थोरात (ग्रामीण आरोग्य सेवा) कस्तुरी प्रतिष्ठान अध्यक्ष मिलिंद मेमाणे (सामाजिक) अण्णासाहेब भोसले, सतिश लोंढे (व्यवस्थापक लोकमंगल पतसंस्था), तुकाराम मेमाणे (सामाजिक, पारगांव), राजेंद्र भटकर (मूर्तीजापूर) रणजित दर्यापूर, युवराज ठाकरे (कला, अमरावती) शिवाजी शेळके (कलाकार) नामदेव जगताप (राजेवाडी), प्रसन्नकुमार साळवी, हमीर काझी (अकलुज) हभप आनंद तांबे, हभप सुरेश कांचन, विजय फाले (कलाकार, गोवा) निनाद शुक्ल (गायक, पुणे) यांना स्मृतिचिन्ह, मानपत्र व शाल देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविक डॉ. अशोक पाटील यांनी केले. सूत्रसंचालक एल डी. साळवे यांनी केले. यावेळी नॉर्मन नॉर्टन, प्रफुल्ल झोपे, अंकुश दळवी, प्रमोद बोंडे उपस्थित होते.