मुंबईः मुंबईतील नायर हॉस्पीटलमधील प्रशिक्षणार्थी डॉ.पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही डॉक्टरांना 21 जून पर्यत न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवालला 21 जूनपर्यत न्यायालयीन कोठडीत ठेवले जाणार आहे. डॉ.पायल तडवी हिने वरिष्ठ डॉक्टरांकडून होणार्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती. हे प्रकरण संपर्णू राज्यात चर्चेत आले होते. संबंधीत आरोंपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. डॉ.पायल तडवीच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा रॅगिंगचे प्रकरण डोकेवर काढत आहे.