मलकापूर- नांदूरा तालुक्याचा सर्वांगिण विकास साधणार

0

डॉ. उल्हास पाटील यांचे बुथ कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन

मलकापूर – मलकापूर-नांदूरा तालुुका आमच्या हक्काचा तालुका असल्याने हया तालुक्याचा सर्वागिण विकास साधण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याचे आश्वासन कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस, पिरीपा, शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांनी आज मलकापूर येथे बुथ कार्यकर्ता मेळाव्यात केले.
रावेर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी आज मलकापूर शहरात प्रचार दौरा केला.डॉ. उल्हास पाटील यांचे आगमन हाताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. यावेळी सुहासिनींनी डॉ.उल्हास पाटील यांचे औक्षण केले तसेच ढोल ताशांच्या गजरात डॉ उल्हास पाटील यांच्या प्रचाराला सूरूवात झाली.बुथ मेळाव्यात मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी येत्या १० दिवसात बुथ सदस्याची जबाबदारी वाढली असून जागृत राहावे असे सांगीतले. जांभुळधाबा, लोणवाडी, दुधलगाव, दाताळा, उसाळी, वरखेड, प्रचार रॅलीदरम्यान मलकापूर तालुका हा विकासापासून वंचीत राहीला आहे. त्यामूळे या भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी साथ दया असे आवाहन डॉ उल्हास पाटील यांनी नागरिकांनी केले. नागरिकांनी परिवर्तन करूनच राहणार आणि पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली. यावेळी विजय अंभोंरे,अ‍ॅड साहेबराव मोरे, डॉ. अरविंद कोलते, अ‍ॅड हरीष रावड, हाजी रशिदखाँ जमदाह, श्याम राठी, हितेश पाटील, प्रमोद अवसरमोल, राजू पाटील, बंडू चौधरी, मंगला पाटील, राजू आवळे, सु.मा शिंदे, सोपान खेवलकर, निवृत्ती तांबे, अ‍ॅड. मजीद कुरैशी, रमेश खाचणे, माधवराव गायकवाड, बाळू पाटील, भगवान तायडे, सुरेशचंद्र पाटील, साहेबराव मोरे, संभाजी शिर्के, गजानन तायडे, राजू मोरे, ज्ञानदेव कोलते, सिध्दांत इंगळे,नारायणदास निहलानी,अशोक सुरळकर, गजानन तायडे, डॉ. महेबूब,इ मान्यवर उपस्थीत होते. मलकापूर शहरातून रॅली काढण्यात आली यावेळी डॉ. उल्हास पाटील यांना परिवर्तनाचा निर्धार नागरिकांनी बोलून दाखवला.

नादुंरा मेळाव्याला अभुतपुर्व प्रतिसाद
नांदुरा येथे आयोजीत मेळाव्याला आज कार्यकर्त्यांनी अभुतपुर्व प्रतिसाद दिला. हरीभाउ मंगल कार्यालयात आयोजीत मेळाव्यात मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी प्रत्येक बुथ सदस्यांनी येत्या १० दिवसात घराघरात जाउन मतदार यादीतील नावे तपासून घेणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त मतदान कसे होईल यांची काळजी बुथ सदस्यांनी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी प्रदीप हलगे, नितीन मानकर, युवराज देशमूख, संगीता भातूरकर, बंडू चौधरी, मंगला पाटील, राजू आवळे, सु.मा शिंदे, सोपान खेवलकर, निवृत्ती तांबे, संभाजी शिर्के, गजानन तायडे, राजू मोरे, ज्ञानदेव कोलते, सिध्दांत इंगळे सतीश पाटील उपस्थित होते.
आजचा दौरा- देवगांव, धानोरा, पंचक, लोणी फाटा, अडावद, वर्डी, चोपडा, अकुलखेडा, चहार्डी, हातेड, गलंगी, वेढोदा, कुसुंबा.