रावेर मतदारसंघात परिवर्तन घडवा

0

आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचे आवाहन

चोपडा – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा चोपडा तालुक्यात जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आ. अरूणभाई गुजराथी यांच्यासह मित्रपक्षाचे नेते मोठ्या संख्येन सहभागी झाले होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्यासाठी आज चोपडा तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली. देवगावपासून या रॅलीला सुरवात करण्यात आली. धानोरा, पंचक, लोणी फाटा, अडावद, वर्डी, चोपडा, अकुलखेडा, चहार्डी, हातेड, लासुर, गलंगी, वेढोदा, कुसुंबा येथे प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली होती. डॉ. उल्हास पाटील यांची धानोरा, पंचक या गावातुन मोठी रॅली काढुन शक्तीप्रदर्शन करण्यात आले. नागरीकांनी देखिल डॉ. उल्हास पाटील यांना चांगला प्रतिसाद देत परिवर्तन घडविण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी धानोरा येथील अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष मासूम तडवी, सावन महाजन, जि.प.सभापती दिलीप पाटील, महारू तडवी, चंद्रशेखर युवराज पाटील,अडावद येथे जिल्हा सरचिटणीस वजाहद अली, माजी ग्रा.प.सदस्य सईदभाई, जहीरभाई, अमजद खान, शे. ताहेर शे. माणियार, अमीनाबाई तडवी, माजी जि.प सदस्य दिगंबर पाटील, साखरलाल महाजन, सदिप महाजन, फजल सेठ, इकबाल खान, बंटी शिंदे, बाळासाहेब पाटील, डॉ सेलचे ता.अध्यक्ष डॉ कांतीलाल पाटील, माजी सभापती विनायक चव्हाण, माजी सभापती भरत सर, माजी सरपंच साहेबराव तडवी, शिंदे, देवानंद, नरेंद्र शिंदे, नंदलाल शिंदे, पंचक येथे जेष्ठ नेते गुलाब रूपचंद पाटील, अडावद ता.उपाध्यक्ष प्रशांत पाटील, हेमचंद्र पाटील, चहार्डीत जि.प सदस्या निलीमा पाटील, पंडीत सोनवणे, अशोक पाटील, चंद्रकात पाटील, कंखरे, माजी आ. दिलीप सोनवणे, चोपडा उपनगराध्यक्षा सुप्रिया सनेर, कांतीलाल सनेर, योगेश मोकाशे, स्वप्नील सनेर, महारू छगन सोनवणे, अनिल सोनवणे, सोहन सोनवणे, देविदास सोनवणे, विनायक सोनवणे, अशोक सोनवणे, प्रदिप सोनवणे, आनंद बाविस्कर, प्रविण सोनवणे, शिवाजी देसले, प्रविण सोनवणे, हर्षल सोनवणे, नारायण सोनवणे,देवगाव येथे प.स सदस्य बापू खैरनार, कल्पना पाटील, रज्जाक तडवी, राजू तडवी, विजया पाटील, माधुरी पाटील, लोटू पाटील, युवराज पाटील, विक्रम महाजन, डॉ.बी. आर. पाटील, प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, जवरीलाल शेठ यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी महिलाशक्ती एकवटली
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ आज फैजपूर शहरात डॉ. वर्षा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महिलाशक्ती एकवटली होती. डॉ. उल्हास पाटील यांच्यासाठी प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ. वर्षा पाटील यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर शहरातील महिला मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाल्या. याप्रसंगी महिला मतदारांनी डॉ. वर्षा पाटील यांची खणानारळाने ओटी भरून डॉ. उल्हास पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे वचन दिले.


अट्रावल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अट्रावल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यात आले. डॉ. वर्षा पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी अट्रावलच्या सरपंच संगीता चौधरी, सौखेडासीमच्या रागीणी पाटील, दिपाली पाटील, साधना झांबरे, सुनिता पाटील, कल्पना पाटील, प्रमिलाताई, भारती महाजन, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, मंदा भिरूड यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.