रावेर मतदारसंघाच्या भवितव्यासाठी डॉ. उल्हास पाटील यांना साथ द्या

0

अंतुर्ली येथे संपर्क कार्यालयाचे दणक्यात उद्घाटन

रावेर – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ आज रावेर मतदारसंघात डॉ. वर्षा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचार दौरा करण्यात आला. रावेर मतदारसंघाचे भवितव्य खर्‍या अर्थाने घडविण्यासाठी डॉ. उल्हास पाटील यांना साथ द्या असे आवाहनही त्यांनी केले.
रावेर शहरातुन डॉ. वर्षा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्यासाठी प्रचार रॅली काढण्यात आली. रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेंडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून डॉ. वर्षा पाटील यांनी रॅलीला प्रारंभ केला. यावेळी डॉ. वर्षा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावेर तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाल्या. डॉ. उल्हास पाटील यांना निवडून आणण्यासाठी एकवटलेल्या या महिलाशक्तीने अभोडा, जिन्सी, मोरव्हाल,गुलाबवाडी, पाल, निमडया, गारखेडा, सहस्वलिंग, लालमाती, येथे घरोघरी जाऊन डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीमागील भूमिका नागरीकांना समजावुन सांगितली. याप्रसंगी महिला मतदारांनी डॉ. उल्हास पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे वचन दिले. डॉ. वर्षा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या प्रचार रॅलीस रावेर तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. वर्षा पाटील यांनी पाल येथे प.पू. लक्ष्मण चैतन्यजी बापू यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
डॉ. उल्हास पाटीलांच्या प्रचारार्थ कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस,पिरिपा, शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे विविध पदाधिकारी जोमाने कामाला लागले असून चोपडा, यावल, फैजपूर सावदा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, भुसावळ मलकापूर नांदूरा शहरातील आमदार, माजी आमदार, जि.प सदस्य, ता.अध्यक्ष, माहिला आघाडी, युवक आघाडी, ब्लॉक अध्यक्ष, आपल्या प्रमुखांच्या मार्गदर्शनानुसार घरोघरी जाउन मतदारांना भुमिका पटवून देत असतांना डॉ. उल्हास पाटील यांना विजयी करण्यासाठी आवाहन करीत आहे.

अंतुर्ली येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनोद तराळ, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, यु.डी.पाटील,आनंदराव देशमुख,आत्माराम जाधव,डॉ.जगदीश पाटील,आसिफखान इस्माईल खान, सोपानराव दुट्टे, विजय सोनार, राजू चौधरी, भागवत पाटील,मारोती सुरळकर,नारायण बोराडे,सादीक शेख,चांगदेवचे अनिल पाटील, महेंद्र पाटील, देवेंद्र मराठे,साहेबराव पाटील, दिनकर भालेराव, अतुल जावरे, अरूण कांडेलकर, शाईदखान, निरज बोराखडे शकील आझाद, पिंटू पाटील आदी उपस्थित होते. अंतुर्ली येथे राष्ट्रवादीचे नेते विनोद तराळ यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरीकांकडुन मोठा प्रतिसाद मिळाला.
डॉ उल्हास पाटील यांचा आज रावेर दौरा – वाघोदा येथून प्रारंभ, चिूावल, कुंभारखेडा, लोहारा, उटखेडा, कुसुंबा, मुंजलवाडी, शिंदखेडा, रफलपुरा, रमजीपूर, बक्षीपूर, खिरोदा, जंगली पीर, केर्‍हाळा, अहिरवाडी, पाडळे बु.खू, नेरूळ, खानापूर, चोरवड, अटवाडे, अजनाड, मोरगांव वाघोद, कर्जोद, भोकरी, रावेर येथे समाप्ती.