पत्नीचा खून केल्या प्रकरणी मद्यपी पतीस जल्मठेप

मद्य पिण्यास पैसे न देणाऱ्या पत्नीचा खून केल्या प्रकरणी न्यायालयाने मध्यपी पतीला जल्मठेपची शिक्षा ठोठावली आहे.

नाशिक l आरोपी त्याची पत्नी विमल हिचेसह शेतामध्ये राहत होता व भाजीपाला विक्री करुन ते आपला उदरनिर्वाह करत होते. आरोपीस दारु पिण्याचे व्यसन असल्याने तो दारु पिण्यास पैसे न दिल्यास पत्नी विमल हिस मारहाण करीत असे. दिनांक १०. १२.२०२० रोजी आरोपीने त्यांचे गावातील पंडीत गावीत यास त्याने रात्री फोन केला होता. त्यानुसार गावातील पोलीस पाटील व इतर गांवकरी हे सकाळी घटनास्थळी गेले असता त्यांना विमल मयत झाल्याचे दिसले व त्याठिकाणी त्यांचेसमध आरोपीने विमल हिस मारहाण केल्याचे सांगितले तसेच त्या ठिकाणी दगड व खडकावरुन फरफटल्याच्या खुना दिसून आल्या होत्या व त्यामुळे आरोपीचा मुलगा उमेश कुवर याने पोलीसांमध्ये वडीलांविरुध्द आईचा खुन केल्याची फिर्याद दाखल केली. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन सहा.पो.नि. बोडके यांनी करुन आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

सदरच्या गुन्हयात फिर्यादी तर्फे एकूण नउ साक्षीदार तपासण्यात आले. मयताचा मुलगा हा त्याचे साक्षीदरम्यान फितुर झाला, मात्र पंडीत गावीत तसेच पोलीस पाटील निवृत्ती चव्हाण व इतर गांवकरी यांची साक्ष तसेच डॉ. सुरेश पांडोळे व पोलीस कर्मचारी यांची साथ ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सदरच्या खटल्यात फिर्यादीच्या वतीने अॅडव्होकेट डॉ. सुधीर कोतवाल, विशेष सरकारी वकील यांनी काम पाहिले. सदर खटल्याचा निकाल मा. श्रीमती. अदिती कदम, जिल्हा व सत्र न्यायाधीश- २, नाशिक यांच्या न्यायालयात झाला. न्यायालयीन कामकाजात सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पैरवी अधिकारी श्री. डुकले, पोलीस शिपाई यांनी कामकाजात मदत केली.