नशा केल्याने सर्व इंद्रियांची क्षमता कमी होऊन नपुसंकता निर्माण होते : प्रा. सुमित काबरा

जामनेर प्रतिनिधी ।

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव व इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात समान संधी केंद्रसामाजिक न्याय पर्व- २०२३ अंतर्गत नशामुक्ती अभियान उपक्रम महाविद्यालयात राबवण्यात आला.

नशा केल्याने सर्व इंद्रियांची क्षमता कमी होऊन नपुसंकता निर्माण होते.

व्यसनामुळे शरीरावर मानसिक दुष्परिणामाचे, व्यसन कसे जडते आदी बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचे जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुमित काबरा यांनी दिली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जे. पी. पाटील, उपप्राचार्य प्रा. के. एन. मराठे, पर्यवेक्षक प्रा. के. डी. निमगडे आदी मान्यवराची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समान संधी केंद्र प्रभारी प्रा. समीर घोडेस्वार यांनी केले. या नशामुक्ती अभियानात १५२ युवक- युवतीचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संदीप राजपूत, प्रा. सोनूसिंग पाटील, प्रा. कोमलसिंग परिहार, प्रा. योगेश पोळ आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.