वरणगांव l भुसावळ – दिपनगर महामार्गावरील साकरी फाट्याच्या उड्डाण पुला लगत शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जुन्या वादातुन दुचाकीवर आलेल्या तिघांनी गोळीबार केला . यामध्ये दोन जण जख्मी झाल्याची घटना घडली असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत . या घटनेमुळे भुसावळातील गुन्हेगारीने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरूवात केल्याने भुसावळ गुन्हेगारीचे माहेरघर असल्याचे समोर आल्याने भुसावळ शहरासह परिसरात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे .
दि.१४ एप्रील भुसावळ शहरात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जल्लोष सुरु असतांना भुसावळ पासुन अवघ्या काही अंतरावर असलेल्या साकरी फाट्याजवळ अक्षय सोनवणे, मंगेश काळे व त्यांचा एक मित्र असे तिघे रात्री १० वाजेच्या सुमारास जेवणासाठी जात होते . याच दरम्यान उड्डाणपुलालगत तिन जण दुचाकीवर येवुन त्यांनी जुना वाद उकरून काढला व या वादातुन तिघांनी अक्षय सोनवणे व मंगेश काळे यांच्यावर गोळीबार केला . या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जख्मींना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले . तर घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जखमींची भेट घेवून विचारपुस केल्यानंतर तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या शोधार्थ पोलीसांची पथके रवाना केली . तर हल्लेखोर हे भुसावळच्या खडकारोड भागातील असल्याचे समजते . तसेच पोलीसांनी हल्लेखोरांना लवकरच गजाआड केले जाईल असे सांगितले असलेतरी भुसावळातील गुन्हेगारी कमी होत नसल्याचे अनेक घटनांवरून समोर येत असल्याने भुसावळसह परिसरातील नागरिकांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे .
भुसावळ गुन्हेगारांचे माहेर घर
भुसावळ शहर हे रेल्वेचे जंक्शन स्थानक असल्याने या शहरात देशभरातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते . यामुळे रेल्वेतील प्रवाशांचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम चोरी, अंमली पदार्थांची तस्करी अशा प्रकरणामुळे गुन्हेगारांना पोषक वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगार खेळण्यातील बंदुकीप्रमाणे गावठी कट्टे सर्रास वापरतांना दिसून येत आहे . मात्र, अशा अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे . यासाठी पोलीसांनी प्रतिबंधात्मक कठोर उपाय योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याची मागणी सर्व सामान्य नागरीकांमधून होत आहे .