गावात डॉ .आंबेडकरांच्या जयंतीची मिरणुक काढली म्हणुन जातीयवादया तरुणांनी केला तरुणांचा खुन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी निळे निशाणची मागणी

यावल प्रतिनिधी l

गावात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणुक काढणाऱ्या तरूणावर जातीवादयांनी अमानुषरित्या धारदार चाकुने हल्ला करून हत्या केली असुन या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निळे निशाण या सामाजीक संघटनेच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आछे . या संदर्भात निळे निशाण सामाजीक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे व तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या बोंढार या गावात राहणारा अक्षय भालेराव या तरूणाने गावात प्रथमच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची १४ एप्रील रोजी भव्य अशी मिरवणुक काढली याचे गावातील १५ते २० एका समाजाचे जातीयवादी समाजकंटकांना हे आवडले नाही याचा राग मनात ठेवुन या जातियवादी तरुणांनी १ जुन२०२३ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास बोढार गावातील एका ठीकाणी लग्न होते या ठीकाणी काही तरुण डिजेवर नाचन होते , यावेळी अक्षय भालेराव हा तरूण जेवण करून फिरत असतांना यापुढे गावात कुणीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयती मिरवणुक कुणी काढणार नाही यासाठी गावातील १५ते २० एका समाजातील जातीयवादी तरूणांनी मिळुन अक्षय भालेराव या निष्पाप तरूणास बेदम मारहाण करून धारदार चाकुने वार करून केले या भ्याड हल्ल्यात अक्षय भालेराव हा तरूण मरण पावला आहे . या अमानुष हत्या मध्ये शामील असलेले सर्व जातीयवादी गुंडांना भादवी कलम३०२ अनुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी तसे न झाल्यास निळे निशाण सामाजीक संघटनाच्या माध्यमातुन तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे . तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर अशोक तायडे , विलास तायडे , लक्ष्मीताई मेढे, सतिष अडकमोल, अनिल इंधाटे , अमोल तायडे , मिलींद सोनवणे , मांगीलाल भिलाला, हिरालाल बारेला , अनारसिंग भिलाला , नान्या बारेला, सायमक बारेला आदींच्या स्वाक्षरी आहेत .