मेहरूण तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू 

0
जळगाव- मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना  सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. मोहम्मद दानिश मोहम्मद युसुफोद्दीन पिरजादे वय 13 व मोहम्मद खालिक अनिशोद्ीन पिरजादे अशी या मुलांची नावे असून हे दोन्ही पिरजादे वाडा येथील रहिवासी आहे. दोघेही दुपारी मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेले होते.
अचानक खड्यात गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शेजारी म्हशी चारण्यासाठी आलेल्या एकाने आवाज दिल्यानंतर दोन तरूणांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, तो दोघा मुलांचा मृत्यू झालेला होता. दोघांचे मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. दरम्यान,  मोहम्मद खालिकचे आई-वडील चोपडा येथे कामानिमित्त गेल्याची माहिती आहे.