हरताळा परिसरातील वादळाने अचानक वीज पुरवठा करणारे टावर (हाय व्होल्टेज टॉवर) कोसळल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील व शहरातील पुरवठा खंडित

मुक्ताईनगर प्रतिनिधी….
तालुक्यातील हरताळा परिसरातील वादळाने अचानक वीज पुरवठा करणारे टावर (हाय व्होल्टेज टॉवर) कोसळल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील व शहरातील पुरवठा खंडित झाला होता सदर वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी तब्बल दोन दिवसाचा कालावधी लागणार होता यामुळे तालुक्यातील शेती तसेच आरोग्याच्या सेवा विस्कळीत झाले असते . आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी भ्रमणधणी वरून संवाद साधल्यानंतर ऊर्जामंत्री यांचे आदेशाने वीज वितरण कंपनी तर्फे जोखीम स्वीकारून अवघ्या सहा तासात वीज पुरवठा पूर्ववत केल्या मुळे वीज पारेषण व वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत असे गौरव उद्गार मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सकाळी त्यांचे निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काढले. परंतु अद्यापही विजेचे संकट हे टळलेले नाही पुन्हा उद्या मंगळवारी 13 जून रोजी सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत या दुरुस्तीचे काम चालणार आहे त्यामुळे या कालावधीत वीज पुरवठा बंद राहणार असून जनतेने सहकार्य करावे असे आवाहन आमदार पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
रविवार दिनांक अकरा रोजी हरताळा परिसरात मोठ्या प्रमाणात अचानक वादळ आल्याने या परिसरात उच्च दाबाने वीज पुरवठा करणारे टावरचे नुकसान झाले यामुळे दिपनगर ते मुक्ताईनगर असा काल दिनांक 11 रोजी सायंकाळी सहा वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. सदर टावर हे साधारण 1980 पासून उभारण्यात आलेले होते हे टावर डबल सर्किट लाईनचे असून त्या ठिकाणाहून मुक्ताईनगर ते बोदवड तसेच मुक्ताईनगर ते दिपनगर अशा पद्धतीने वीज पुरवठा करण्यात येतो. यामुळे संपूर्ण तालुका व परिसर अंधारमय झाला होता. हरताळा गावाजवळ असलेला हा टावर पायापासून पूर्णपणे उखडून सुमारे वीस फूट लांब तारांवर लटकलेला होता. अशा परिस्थितीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन वीज वितरण व वीस पारेषण च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता सुमारे दोन दिवस कामासाठी लागणार असून त्यामुळे दोन दिवस मुक्ताईनगर तालुका व शहरातील वीज पुरवठा खंडित असल्याचे सांगितले परंतु मुक्ताईनगर तालुका केळी पिकवणारा बागायतदार कडाक्याच्या उन्हात तब्बल दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहील शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान होणार आहे इतकेच नव्हे तर दवाखान्यांमध्ये आरोग्य सेवा विस्कळीत होईल परंतु हे होऊ नये म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून तात्काळ वीस पुरवठा कशा पद्धतीने तालुक्याला सुरळीत करता येईल यासाठी उपाय योजना कराव्यात अशी विनंती केली त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिल्यामुळे वीज वितरण व विज पारेषण चे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ मुक्ताईनगर येथे घटनास्थळी धाव घेऊन युद्ध पातळीवर काम सुरू केले. आणि त्या दृष्टीने त्यांनी रविवारी रात्री केवळ सहा तासात मुक्ताईनगर तालुका वासियांना वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश संपादन केले. नादुरुस्त झालेल्या टावर ची एक लाईन सुरू होती तसेच सौर ऊर्जा प्रकल्प येथून वीज पुरवठा घेण्यात आला होता . अतिशय जोखीम पत्करून वीज वितरण व वीज पारेषण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांनी वीज पारेषण अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. पथकात वीज वितरण चे मुख्य अभियंता कैलास हुमणे, वीज वितरणचे अधीक्षक अनिल महाजन, ,महापारेषण चे अधीक्षक अभियंता अनिल भारसाकडे, पारेषण चे कार्यकारी अभियंता विनोद लोखंडे, महापारेषण चे मुख्य अभियंता संजिव भोळे, अधीक्षक विलास खाचणे, वितरणचे कार्यकारी अभियंता ब्रिजेश कुमार गुप्ता, महापारेषण चे कार्यकारी अभियंता जयंत वाघमारे तसेच मिलिंद भामरे , उपकार्यकारी अभियंता तसेच ज्युनिअर इंजिनियर तसेच कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. यांच्यासह महापारेषण च्या दहा अधिकाऱ्यांसह तब्बल 30 कर्मचारी हे युद्ध पातळीवर काम करीत आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी नगरसेवक बबलू कोळी, पियुष महाजन ,शिवराज पाटील, संदीप पाटील ,दिलीप पाटील, महेंद्र मोंढाळे, आमदारांचे स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी उपस्थित होते. नादुरुस्त झालेल्या टॉवरच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणे झाडे झुळपे होती, वीज कर्मचाऱ्यांना अडचण निर्माण होत होती यासाठी आमदार पाटील यांनी स्वतः दोन जेसीबी यंत्र लावून टावरच्या आजूबाजू असलेली झाडेझुडपे काढून परिसर स्वच्छ केला.

### मंगळवारी सकाळी सात ते बारा राहणार वीज पुरवठा बंद : ……

सदरचे उध्वस्त झालेले टावर चे काम पूर्ण करण्यासाठी चार ते पाच दिवस लागणार असून मंगळवार दिनांक 13 जुन रोजी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन वीज कंपनीकडून करण्यात आले.