जळगावात झेरॉक्स मशीनवर तयार केलेल्या बनावट नोटा जप्त !

0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; दोन संशयितांसह झेरॉक्स मशिनसह साहित्य जप्त

जळगाव- भारतीय चलनी 100 रुपयांच्या नोटांचे कलर झेरॉक्स करुन बनावट नोटा चलनात आणणार्‍या दोघांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. 16 रोजी पथकाने केलल्या कारवाईत 74 हजार 300 रुपयांच्या 100 रुपये दराच्या बनावट नोटांसह झेरॉक्स मशीन व नोटा बनावटीकरण करण्याचे साहित्य तसेच अमजदखान अफजलखान वय 22 मोहम्मदीया नगर , रा.तांबापुरा व शेख रईस शेख रशीद वय 25 रा. मच्छीबाजार तांबापुरा या दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या संशयितांनी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणली असल्याची शक्यता असून पोलिसांच्या तपासात ते उघड होणार आहे.

कलर झेरॉक्स मशिनीवर बनावट नोटांचा खेळ
शहरातील तांबापुरा परिसरातील शेरा चौकात शेख रईस शेख रशीद व अमजदखान अफजलखान या दोन्ही तरुणांकडे बनावट नोटा असलेली बॅग असून त्यातील नोटा ते चलनात आणणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दामोदरे, रविंद्र भगवान पाटील, अनिल देशमुख , अनिल जाधव, सुधाकर रामदास अंभोरे, पोलीस नाईक अशरफ शेख निजामोद्दीन, दिपक पाटील या पथकाला संशयितांना ताब्यात घेण्याच्या सुचना केल्या. पथकाने शेरा चौकातून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पंचासमक्ष अफजलखान व शेख रईस यांची ची अंगझडती तसेच त्त्यांच्याकडील बॅगमध्ये एकूण 74 हजार 300 रुपयांच्या 100 रुपये दराच्या बनावट नोटा मिळून आल्या. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून झेरॉक्स मशीन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.