नरेंद्र मोदींच्या काळात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून कामे झाली- मुक्ताईनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या पत्रकार परिषदेत अशोक कांडेलकर यांचे वक्तव्य
मुक्ताईनगर प्रतिनिधी….
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू जनहिताची कामे झाल्याचा उल्लेख मुक्ताईनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या आयोजित पत्रकार परिषदे च्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी केले. प्रसंगी ,विधानसभा क्षेत्र प्रमुख ललित महाजन, समाज कल्याण माजी सभापती जयपाल बोदडे , तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे , विनोद पाटील, राहुल राणे , प स सदस्य राजेंद्र सवळे , शहराध्यक्ष पंकज कोळी , तालुका चिटणीस संजय तितुर , संतोष धनके , स्वप्निल नाव्हकर ,अमोल तायडे हे प्रमुख उपस्थित होते. “मोदी एट नाईन” या मोहिमे अंतर्गत विविध प्रकारच्या सेवा सुशासन गरीब कल्याण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे संदर्भात ही पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आलेली होती. संघटनात्मक कामास प्राधान्य बूथ सशक्तिकरण करणे, जनधन खात्यामार्फत 80 कोटी लाभार्थींनागरीब कल्याणी योजना चा फायदा दिला असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी जनतेला मोफत घरे मुद्रा योजना आयुष्यमान भारत कृषी योजना यासह ठिबक सिंचन प्रणाली मध्ये 80 टक्के सबसिडी मुलींचे शिक्षण महिला सबलीकरण कोरोना काळात लसीकरण 220 करोड लोकांना बूस्टर डोस सहित लसीकरण करण्यात आले. राफेल सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे देशाची संरक्षण स्थिती मजबूत झाली त्याचबरोबर राम मंदिर 370 कलम समान नागरी कायदा यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर नरेंद्र मोदी यांचे शासन हे उत्कृष्ट शासन असल्याचे त्यांनी सांगितले “संपर्क से समर्थन” या योजनेअंतर्गत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले