सातारा: सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात सकाळी पावणे आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला असून, परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू कोयनापासून १० किमी अंतरावर असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या भूकंपामुळे नुकसान झाले नाही. आहेत. भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल एवढी नोंदण्यात आली आहे. नेहमी या परीसरात भूकंपाचे धक्के जाणवत असतात.
कोयना, कराड आणि पाटण परिसरात या भूकंपाचा धक्का बसला आहे. सकाळी अगोदर काहीतरी गुढ आवाज आला, या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी बाहेर येऊन पाहिले. त्यांच्या लक्षात आले कि हा भूकंपाचा धक्का आहे. भूंकप असल्याचे समजताच घरातून बाहेर येत सुरक्षितस्थळी जाण्यासाठी सर्वांची पळापळ झाली होती. भूकंपानंतर जिल्ह्यातील कोयना परिसरात वास्तव करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते