नवी दिल्ली- उत्तर भारतात मान्सून पूर्व वादळ व पावसाचे आगमन झाल्याने वातारणात अल्प प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. याचा फटका एसी (एअर कंडीशन) व्यवसायाला बसला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एसी व्यवसायात १५ ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता होती. मात्र लवकर पावसाचे आगमन झाल्याने ते होऊ शकले नाही. केवळ १० टक्के मागील वर्षापेक्षा वाढ झाली आहे. सीजनमध्ये वीडियोकॉन, वोल्टास, व्हर्लपूल, डाइकिन, सैमसंग या एसी विक्रीत डबल वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र तसे झाले नाही.