नवी दिल्ली: गेल्या आठवड्याभरापासून नोबेल पारितोषिकाचे वितरण केले जात आहे. विज्ञान, शांतता क्षेत्रातील पुरस्कारानंतर आता भारतासाठी एक अभिमानाची बाब आहे. भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ईस्टर डूफ्लो ला देखील नोबेल मिळाले आहे. डूफ्लो या अभिजित बॅनर्जीं यांची पत्नी आहेत. पती-पत्नीला नोबेल मिळणे हीबाब भारतासाठी अभिमानास्पद आहे.
ईस्टर डुफलो आणि मायकल क्रेमर या दोन अर्थशास्त्रज्ञांसह अभिजित बॅनर्जी यांना संयुक्तरीत्या हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.