नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहे. दरम्यान आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०१९ राजसभेत मांडले. आर्थिक सर्वेक्षणात सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) ७ टक्के वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावर्षी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात २०१९-२० मध्ये तेलदर कमी होण्याची शक्यता आहे. सामान्य वित्तीय तूट ५.८ टक्क्यांवर आली असल्याचे दिसून येते.