आर्थिक सर्वेक्षण अहवाल निराशावादी !

0

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०१९ मांडला. यात जीडीपी ७ टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थव्यवस्था सुधारल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान माजी अर्थमंत्री कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवालावर टीका केली आहे. सरकारने आर्थिक सर्वेक्षण अहवालातून स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. यात क्षेत्रनिहाय विचार केल्यास कोणत्याही घटकाला न्याय मिळाला नसल्याचे सांगितले आहे. अत्यंत निराशावादी आर्थिक सर्वेक्षण अहवाल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.