मुंबई, नागपूरात ईडीची कारवाई! कोट्यवधी रूपये, दागिने जप्त

नागपूर | संक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) मुंबई आणि नागपूरमधील १५ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत कोट्यावधी रुपयांची रक्कम आणि दागिने ईडीने जप्त केलं आहे. पंकज मेहाडिया गुंतवणूक प्रकरणी ही छापेमारी केल्याचं सांगण्यात येत आहे. या छापेमारीनंतर एकच खळबळ उडाली आहे.

ईडीने पंकज मेहाडिया, लोकेश आणि कार्तिक जैन यांच्या गुंतवणूकप्रकरणी मुंबई, नागपूरमधील १५  ठिकाणांवर धाडी टाकल्या. या धाडीत ५.५१ कोटी रूपयांचं दागिने आणि १.२१ कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या छापेमारीत अनेक महत्वाची कागदपत्रेही ईडीने जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रकरण काय?

१२ टक्के व्याजाचे आमिष दाखवून पंकज मेहाडियाने अनेक गुंतवणूकदरांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पंकजसह त्याची वृद्ध आई प्रेमलता नंदलाल मेहाडिया, लोकेश आणि कार्तिक जैन, बालमुकुंद लालचंद केयाल यांच्याविरोधात यापूर्वी गुन्हा दाखल केला आहे. अशातच आता पंकज मेहाडिया आणि त्याच्याशी संबंधित सुमारे १५ ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. या छापेमारीत आता मोठी रक्कम हाती लागल्याचे समोर आले आहे.