जयंत पाटील यांना ईडीची नोटीस चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई ।

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीने जयंत पाटील यांना उद्या शुक्रवारीच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयएल अँड एफएस प्रकरण पडताळणीसाठी ईडीने जयंत पाटील यांना नोटीस बजावली आहे. ईडीने पाटील यांना उद्याच हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयएल अँड एफएस प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. आली आहे.

या संशयाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांना उद्याच ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, जयंत पाटील यांनी आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचे प्रतिपादन केले आहे. या कंपनीच्या व्यवहारांची यापूर्वीच ईडीकडून चौकशी सुरू असून या कंपनीत मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणात मनीलॉन्ड्रिंग झाल्याचाही संश आहे.