बंगळूर: कॉंग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले कर्नाटक कॉंग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांना ईडीने नोटीस पाठविली होती. त्यानंतर त्यांची चौकशीही झाली. दरम्यान आता त्यांच्या मुलीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने नोटीस पाठविली आहे. त्यामुळे शिवकुमार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राजकीय द्वेषापोटी सरकार शिवकुमार यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचे आरोप कॉंग्रेससह अन्यविरोधी पक्षाकडून होत आहे.