जयंत पाटील यांना पुन्हा एकदा ईडीची नोटीस, २२ मे रोजी हजर राहण्याचे आदेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. त्यांना २२ मे रोजी चौकशी साठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुर्वी जयंत पाटील यांना आज (१५ मे) रोजी हजर राहण्याचे आदेश नोटीसीमधून देण्यात अलं होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितला होता. त्यांची विनंती मान्य करत ईडीने त्यांना २२ मे रोजी चौकशी साठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

जयंत पाटील यांना आयएल आणि एफएस प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी कमिशन रक्कम दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. मात्र यावर जयंत पाटील यांनी ज्या आयएल आणि एफएस कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. त्या कंपनीसोबत माझा रूपयाचाही व्यवहाय नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढचे, हे सगळ्या देशाला माहित आहे, असं जंयत पाटील यांनी म्हटलं आहे.

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यावहार झाल्याचा आरोप होता. या आधी या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अरूणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.