मुंबई : कॅप्टन रोहित शर्माने काल झालेल्या कोलकत्या विरुद्धच्या सामन्यात ३१ बॉल्समध्ये २ चौकार आणि १ षटकारच्या मदतीने ३६ धावा केल्या. ईडन गार्डनच मैदान पुन्हा एकदा रोहित शर्मासाठी लकी ठरल आहे. आयपीएल दरम्यानची मोठी धावसंख्या रोहित शर्माने याच मैदानावर उभारली आहे. रोहित शर्माने २००८ साली याच मैदानात पदार्पण केल. त्यानंतर २०१२ मध्ये पहिल्यांदा आयपीएलमधील शतक ठोकल. २०१३ मध्ये टी २० टीमची कॅप्टन्सी करण्याची संधी देखील रोहितला याच मैदानातून मिळाली. २०१३ आणि २०१५ मध्ये कॅप्टन म्हणूनन पहिले दोन आयपीएल खिताब याच मैदानात मिळाले.
२०१७ ला मुंबईच्या टीमने १०० वा टी २० विजय इथेच मिळवला. इशान किशनच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईची टीम आयपीएल सीझन ११ च्या टॉप ४ मध्ये पोहोचली आहे. काल कोलकाताच्या टीमसोबत झालेल्या सामन्यात मुंबईने २० ओव्हरमध्ये २१० रन्स बनविले. इशान किशन या मॅचचा हिरो ठरला. त्याने २१ बॉलमध्ये ६२ रन्सची तूफानी खेळी करत आपल्या टीमच जिंकण सुनिश्चित केलं. अवघ्या १७ बॉलमध्ये त्याने अर्धशतक केलं. फास्टेस्ट फिफ्टीमध्ये तो आता क्रिस गेल, एडम गिलक्रिस्ट, क्रिस मॉरिस, सुनील नरेन आणि किरोन पोलार्डच्या रांगेत जाऊन बसला. आयपीएलचा सर्वात फास्ट फिफ्टीचा रेकॉर्ड पंजाबच्या के.एल राहुलच्या नावे आहे. २१० रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला कोलकात्याचा संघ १८ व्या ओव्हरमध्येच गारद झाला. कोलकात्याचा संघ १८.१ ओव्हरमध्ये १०८ रन्सच बनवू शकला.