मुंबई- सध्या देशभरात #MeToo मोहिमेचे वादळ उठले असून अनेक मोठी आणि दिग्गज नवे समोर येत आहेत. याची सुरुवात अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अनेकांनी पुढे येऊन आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. तनुश्री दत्ताने 2008 मध्ये ‘हॉर्न ओके’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे. तनुश्री दत्तानंतर बॉलिवूडमधील अनेक महिला सेलिब्रेटी पुढे आल्या असून आपले अनुभव शेअर करत आहेत. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना शैक्षणिक क्षेत्राचाही यामध्ये समावेश असल्याचे सांगितले आहे.
‘शैक्षणिक संस्थांमधूनही अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्या संबंधित संस्थांनी घटनेची गंभीर दखल घ्यावी. शैक्षणिक संस्थांनी प्रकरणाची योग्य दखल घेतली पाहिजे’, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे.
#MeToo मोहिमेमुळे अनेक मोठी नावे समोर आली असून यामध्ये बॉलिवूड पहिल्या क्रमांकावर आहे. नाना पाटेकर, आलोकनाथ, विकास बहल, चेतन भगत, विवेक अग्निहोत्री, रजत कपूर, कैलाश खेर यांच्यावर महिलांनी गैरवर्तवणुकीचा आरोप केला आहे.