केप टाउन – केपटाउन शहराजवळ युद्धसामग्रीची निर्मिती करण्यात येणाऱ्या एका प्रकल्पात काल भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.
स्फोट इतका भीषण होता, की जवळपासची घरेही हादरली. सायकाळी चारच्या सुमारास हा स्फोट झाला. केपटाऊन काउंसिलचे सुरक्षा प्रमुख जे पी स्मिथ यांनी आठ जणांचा मृत्यूला दुजोरा दिला असून बचाव कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.