दहिगाव येथील आठ वर्षीय शेख तलफीन बानोने केले पवित्र रमजान महिन्याचे रोजे

भुसावळ प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील शेख एहतेशाम शेख कदीरोद्दीन यांची आठ वर्षाची मुलगी शेख तलफीन बानो हिने पवित्र रमजान महिन्याचे संपूर्ण रोजे पूर्ण केले असल्याने या चिमुकलीच्या कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सध्या सर्वत्र मुस्लीम बांधवांचा पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू असुन या महीन्यात ईस्लाम धर्मात पवित्र रमजानला अनन्यसाधारण महत्व आहे. या महीन्यात मुस्लीम बांधवांकडुन अल्लाहची विशेष इबारत (उपासना) केली जाते यासाठी रोज़ेदार हे संपुर्ण दिवसभर निरंकार रोजे

(उपवास) पाळत असतात. अशाच प्रकारे तालुक्यातील दहिगाव येथील राहणाऱ्या आठ वर्षाच्या तलफीन बी हिने पवित्र रमजान महीन्याचे पूर्ण रोजे (उपवास) करून समाजामध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे. मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महीन्याचा शेवट होणार असून दहिगाव येथील शेख एहतेशाम शेख कदीरोद्दीन यांच्या आठ वर्षाची मुलगी शेख तलफीन बानो हिने पवित्र रमजान महिन्याचे संपूर्ण रोजे पूर्ण केले आहेत. शेख तलफिन बानो हिने केलेल्या या धाडसाचे समाजबांधवांमध्ये विशेष कौतुक करण्यात येत आहे.