पवारांनी जे केलेे त्याच मार्गाचा नेत्यांकडून अवलंब- आमदार एकनाथ खडसे

0

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणात इतकी वर्षे जे केलं त्याच मार्गाचा अवलंब त्यांच्या पक्षातील नेते करीत आहेत. त्यात वावगे तरी काय आहे? जे जे कोणी भाजपात येत आहेत ते स्वार्थासाठी येत असल्याचा टोला माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज लगावला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जळगावात पार पडल्या. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता आमदार खडसे यांनी सांगितले की, शरद पवारांनी सत्तेत येण्यासाठी माणसे फोडलीत. शिवाय १९७८ साली स्व. यशवंतराव चव्हाण यांची साथ सोडून पवार पुलोद सरकारमध्ये येत मुख्यमंत्री झाले होते. याची आठवण करून देत खडसेंनी पवारांवर टीकास्त्र सोडलं. पवारांनीदेखील वारंवार पक्ष बदलत काँग्रेसची माणसे फोडली. त्यामुळं पवारांनी केलं ते नैतिकतेचं होतं आणि आता त्यांचे नेते जे हे काही करीत आहेत ते अनैतिक आहे असं काहीही नसल्याचे खडसे यांनी सांगितले.
शिवसेनेला विचारण्याची गरज काय?
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत ते म्हणले, आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही. मात्र पक्षाने सर्वांनाच घ्यायचं ठरवलं असल्याने राणेही राज्यातील एक प्रभावी नेते आहेत. मुख्यमंत्री राहिलेले आहेत. असं सांगत याबाबत मात्र पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी राणेंच्या प्रवेशाबाबत ठरवतील. मात्र राणेंना पक्षात घेण्यासाठी शिवसेनेला विचारण्याची गरज काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच भुजबळांना घेण्यासाठी त्यांना देखिल आम्हाला विचारण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले.