भुसावळ- भोसरी जमीन प्रकरणात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी मंत्री एकनाथराव खडसेंना क्लीनचीट दिल्यानंतर खान्देशातील खडसे समर्थकांनी महाराष्ट्रदिनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. तब्बल दोन वर्षांपासून मंत्री पदापासून पायउतार असलेल्या खडसेंमागे चौकशींचे सत्र सुरू असतानाच एसीबीने त्यांना क्लीनचीट देत त्यांनी पदाचा कुठलाही दुरुपयोग केला नसल्याचा अहवालही दिल्याने कार्यकर्ते सुखावले आहेत तर आता नाथाभाऊंची पुन्हा मंत्री पदावर वर्णी लागावी, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
फटाक्यांची आतषबाजी
माजी मंत्री खडसेंना भोसरी जमीन प्रकरणात क्लीनचीट मिळाल्यानंतर शहरातील अष्टभूजा मंदिराजवळ, सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, काच बंगला, पांडुरंग टॉकीज तसेच आमदार संजय सावकारे यांच्या सुरभी नगरातील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली व लाडूसह पेंढ्यांचे वाटप केले. प्रसंगी आमदार संजय सावकारे, जिल्हा संघटन मंत्री प्रा.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, तालुका विस्तारक दिनेश नेमाडे, मनोज बियाणी, युवराज लोणारी, प्रमोद सावकारे, वसंत पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सुमित बर्हाटे, अमोल इंगळे, किरण कोलते, बापू महाजन, देवा वाणी, अॅड.बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, गिरीष महाजन, निक्की बतरा, रमेश नागराणी, पवन बुंदले, राजेंद्र आवटे, राजु नाटकर, पिंटु कोठारी, शफी पहेलवान, रमेश मकासरे, प्रा.दिनेश राठी, किशोर पाटील, आशिक तेली, अनिकेत पाटील, परीक्षीत बर्हाटे, रमाशंकर दुबे, निखील वायकोळे, प्रशांत पाटील, करण यादव, संदीप सुरवाडे, किशोर कोलते, अनिरुद्ध कुळकणी, रवी ढगे, रवी दाभाडे, पराग भोळे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निंभोर्यात पेढे वाटप
निंभोरा येथील स्वानंद कृषी विज्ञान मंडळातर्फे श्री हनुमान मंदिरात नारळ फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. स्वानंदचे अध्यक्ष गिरीश नेहेते, उपाध्यक्ष सुधीर मोरे, सचिव गुणवंत भंगाळे यांच्यासहगटाचे सदस्य राजीव भोगे, सुनील कोंडे, सचिन चौधरी, मोहन भंगाळे, रवींद्र भोगे, विवेक बोंडे, हेमंत भंगाळे, गणेश बोरोले यांच्यासह सहकारातील ज्येष्ठ नरेंद्र तात्या पाटील, गिरधर भंगाळे, शंकर सरोदे, कडू हरी भंगाळे, मोहन बोंडे, चंद्रभान सूर्यवंशी, भालचंद्र कोळंंबे, प्रमोद खाचणे, महेश भंगाळे, अनिल दोडके, खंडू नेमाडे, दगडू भारंबे, अनिल बर्हाटे, दिनेश काटोले, सुरेश बर्हाटे, गणेश खाचणे, ललित दोडके, जनार्दन बर्हाटे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फैजपूरात घोषणा
फैजपूर- शहरातील बापू वाघुळदे वर्क शॉप समोर व सुभाष चौकात समर्थकांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ‘नाथाभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या. जळगांव जिल्हा दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, नगरसेवक मिलिंद वाघुळदे, माजी तालुकाध्यक्ष नितीन राणे, शहराध्यक्ष संजय रल, खरेदी-विक्री संघाचे संचालक नितीन नेमाडे, उपाध्यक्ष अनंता नेहते, रवींद्र होले, निलेश पाटील, विनोद कोल्हे, संजय सराफ, जितेंद्र वर्मा, संजय भावसार, नितीन बोरोले, केशव सुपे, दीपक होले, भीमराव मेढे, सुनील दुसाने, सुनील जोगी यासह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.