शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनातून टीका
मुंबई:- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड घेतल्याचा आरोप करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले आहे. एकनाथ खडसे यांच्या हट्टापायी सुरेशदादा जैन यांनाही तीनेक वर्षे तुरुंगात जावे लागले. तर स्वकीयांमुळे खडसे यांना अटक झाली नसली तरी दोन वर्षे राजकीय वनवास भोगावा लागला, असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
खडसे ‘क्लीन चिट’चा आधार घेऊन ‘एसीबी’मधून बाहेर पडले. दुसरीकडे भुजबळ, खडसे यांच्याइतकेच गंभीर आरोप असतानाही कृपाशंकर सिंह हे फडणवीसांच्या राज्यात सहीसलामत सुटले. कायदा हा असा मृदंगाप्रमाणे दोन्ही बाजूंनी वाजवला जातो, असे अग्रलेखात म्हटले आहे.