शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अभिजित पाटील तर उपसभापतीपदी डाॅ सुरेश नाईक यांची बिनविरोध विरोध निवड
शहादा | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अभिजित पाटील तर उपसभापतीपदी डाॅ सुरेश नाईक यांची बिनविरोध विरोध निवड झाली. बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करून आंनदोत्सव साजरा करण्यात आला . माजी सभापती आजोबा फकिरा जयराम पाटील यांच्या ७० वर्षानंतर नातु अभिजित पाटील यांची सभापतीपदी निवड झाली तर ७० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच आदिवासी उपसभापती म्हणून डाॅ सुरेश नाईक हे विराजमान झाले. या बाजार समितीत पहिल्यांदाच दोन इतिहासाची घटना झालयाची नोंद झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निरज चौधरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घनश्याम बागले , हेमंत चौधरी यांनी काम पाहिजे.
शहादा कृषी बाजार समिती स्थापना १९५० साली झाली होती. पहिले सभापती म्हणून डाँ विश्राम हरी पाटील यांची निवड झाली होती. या नंतर १९५६ते ५७ दरम्यान विद्यमान नवनिर्वाचित सभापती अभिजित पाटील यांचे आजोबा फकिरा जयराम पाटील हे झाले होते. १९५७ पासून ते आज २०२३ पर्यत स्व आण्णासाहेब पी के पाटील गटाचे आबादीत वर्चस्व राहिले . या बाजार समितीत परिवर्तन झाले पाहिजे म्हणून माजी जि प कृषि सभापती अभिजित पाटील यांनी चांगलीच कंबर कसुन शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून लोकशाही विकास पॅनेचे गट प्रमुख सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील , पालक मंत्री विजयकुमार गावित यांच्या शेतकरी बळीराजा पॅनेलचा पूर्णपणे धुव्वा उडवून एकतर्फी विजय मिळवून १८ पैकी १४ जागा जिंकून आपले वर्चस्व सिध्द करुन ७० वर्षाची सत्ता उलटून टाकली.
यामुळे सर्वत्र आंनद साजरा होत आहे
नवनिर्वाचित सदस्य सभापती अभिजित पाटील, उपसभापती डाॅ सुरेश नाईक तर संचालक
चौधरी दिलीप लिमजी ,
जगदीश काशिनाथ पाटील, भानुदास भाऊराव पाटील, मयुर दीपक पाटील , विलास काशिनाथ पाटील, शिवाजी मोतीराम पाटील , शिलाबाई दगडू पाटील , हर्षदा अंबालाल बावा , कांतीगीर उमरावगीर पाटील, सत्यानंद प्रकाश गिरासे, मोहनसिंग जयसिंग पाटील , रविंद्र परसू , अहेर शांतीलाल छोटूलाल , जैन मोतीलाल मोहनलाल, जैन रुपेश जसराज , भिल जिवन जससिंग आदी समितीवर निवडून आले
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया झाली. निवडणूक पूर्वी संचालक मंडळांची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमाते सभापतीपदासाठी अभिजीत पाटील तर उपसभापती पदासाठी डॉ. सुरेश नाईक यांचे नाव जाहीर करण्यात आले. सकाळी ११ वाजता सभापतीपदासाठी अभिजीत पाटील व उपसभापती पदासाठी डॉ. सुरेश नाईक यांचे एकमेव अर्ज आल्याने नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी नीरज चौधरी यांनी निवड घोषित केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घनश्याम बागल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांनी निवडणूक कामी सहकार्य केले.
अभिजीत पाटील यांची सभापती निवड झाल्याबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. नूतन सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवाय अभिजीत पाटील यांच्या निवासस्थानी देखील जल्लोष करण्यात आला.
यावेळी देव मोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पटेल, डॉ. किशोर पाटील, शहादा तालुका एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील, संचालक जयदेव पाटील, म्हसावद येथील हिरालाल पाटील, दत्तू पाटील, दिलीप गांगुर्डे, प्रकाशा येथील सामाजिक कार्यकर्ते हरी दत्तू पाटील, संतोष वाल्हे, माजी नगरसेवक लोटन धोबी, अजित बाफना, माजी नगरसेवक आनंदा पाटील, माजी सरपंच किरण सोनवणे, नगीन पाटील सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती अभिजीत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केलेत.
कृषि उत्पन्न बाजार शहर तालुका तालुका जिल्हा नंददुरब
समितीचे सभापती व त्यांचा कार्यकाळ स्थापना तारीख १/९/१९५०
डॉ. विश्राम हरी पाटील, शंकर संभु पटेल, फकिरा जयराम पाटील (प्रभारी), डॉ. विश्राम हरी पाटील, मानमल शिवलाल संचेती, आनंदराव सुपडू पाटील, बन्सी बधु पाटील, सुदाम दत्तू पाटील, छगन बुला पाटील, इसहाक इब्राहीम इसानी (प्रभारी), निंबा तानाजी पाटील सखाराम सदाशिव पाटील, छत्रसिंह नागोसिंह राऊळ, रोहिदास शंकर पटेल, आनंदराव सुपडू पाटील, जी.सी. राणे (प्रशासक), एस. एम. जोशी (प्रशासक), माणिक वल्लभ चौधरी, बापुसाहेब दिपक पुरुषोत्तम पाटील, डॉ. किशोर सखाराम चौधरी, सुनिल सखाराम पाटील, रविंद्र केसरसिंग राऊळ (प्रभारी)