मुक्ताईनगर प्रतिनिधी..,
महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत सन 2023-24 मध्ये .पालकमंत्री .गुलाबराव पाटील जळगांव यांचे शिफारशीनुसार मुक्ताईनगर तालुक्याकरीता तालुका स्तरीय शेतकरी सल्ला समितीस मान्यता प्राप्त झालेली आहे. सदर समितीचा कालावधी 2 वर्ष एवढा आहे. शेतकरी सल्ला समितीची निवड हि मुक्ताईनगर तालुकयातील .आमदार चंद्रकांत पाटील विधानसभा सदस्य मुक्ताईनगर-बोदवड संघ यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली.या आत्मा समितीवर .महेंद्र मोंढाळे कोळी, मुक्ताईनगर यांची अध्यक्ष म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली. ते शेतीक्षेत्रात अभ्यासु वृत्तीने काम करत आहेत तसेच नैसर्गीक शेतीमध्ये त्यांचे उल्लेखनीय काम सुरु आहे. देशी गो आधारीत नैसर्गीक शेतीच्या माध्यमातुन विषमुक्त अन्नधान्य भाजीपाला उत्पादन व्हावे यासाठी त्यांचे सातत्याने काम सुरु आहे. तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती मध्ये शेतकरी पशुसंवर्धन-02, महिला शेतकरी पशुसंवर्धन-02, शेतकरी-02, महिला शेतकरी-02, शेतकरी फलोत्पादन-02, महिला शेतकरी फलोत्पादन-02, महिला मंडळ-02, युवक मंडळ-02, शेतकरी गट-02, निविष्ठा पुरवठादार-02, प्रगतशील शेतकरी-03 याप्रमाणे एकुण 23 शेतक-यांची निवड करण्यात आलेली आहे.