यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवकच्या अध्यक्षपदी विरावलीचे पवन युवराज पाटील यांची निवड

यावल ( प्रतिनिधी ) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुकाध्यक्षपदी पवन युवराज पाटील यांची निवड जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र भैय्या पाटील व तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा युवक अध्यक्ष उमेश पाटील यांनी जळगाव येथे झालेल्या बैठकीत केली असून निवडीचे पत्र पाटील यांना दिले आहे.

पवन पाटील हे विरावली चे ग्राम पंचायत सदस्य असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तसेच राकाॅचे युवक तालुका उपाध्यक्ष म्हणून जवाबदारी सांभाळली . जळगाव येथे झालेल्या बैठकीस यावल तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,चोपडा पंचायत समितीचे सभापती डी.पी.साळुंखे,यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय पाटील , बोदडे नाना, फैजपूर चे शहराध्यक्ष अन्वर खाटीक ,विकासो संचालक किरण पाटील ,अन्वर सईद, जाकीर भाई,ललित पाटील, राहुल चौधरी, रोहन महाजन ,अशोक भालेराव मोहसीन खान, चंद्रकांत येवले, विशाल पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील, संचालक गणेश पाटील, सारंग अडकमोल, मनोज तडवी, गजानन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विशाल पाटील , भैय्या पाटील , योगेश पाटील, निलेश बेलदार , गिरीश पाटील , राजेश अडकमोल , कोमल सिंग पाटील , मनू महाजन, विनोद पाटील,तुषार येवले ,पितांबर महाजन, भगवान बर्डे आदी उपस्थित होते .