शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड 19 मे ला

शहादा : येथील शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड शुक्रवार दि. 19 मे 2023ला सकाळी 11 वाजता संघाच्या सभागृहात होणार आहे. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) श्रीमती भारती ठाकूर यांनी दिली.

शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या 21 जागांसाठीची निवडणूक 9 मे 2023ला माघारीअंती बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता नवनिर्वाचित संचालकांची सभा आयोजित करण्यात आली आहे. तीत अध्यक्ष व उपाध्यक्षची निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती ठाकूर व संघाचे व्यवस्थापक अनिल पाटील यांनी दिली.

खरेदी विक्री संघावर सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष बापूसाहेब दिपकभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाने सर्वांचे सहकार्य व सांघिक प्रयत्नामुळे बिनविरोध झाली. नेहमीप्रमाणे सत्ताधारी गटाचे नेते बापूसाहेब दीपकभाई पाटील हे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करतील. त्यामुळे या पदांवर कोणाला संधी मिळते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.

निवडून आलेले संचालक असे- उमाकांत तुकाराम चौधरी (कुढावद), विनोद जाधव चौधरी (कवठळ त.श.), अनिल अशोक पाटील (म्हसावद), अरविंद सुदाम पाटील (पुसनद), गणेश उत्तम पाटील (शहादा), दिलिप ज्ञानदेव पाटील (प्रकाशा), मकरंद नगीन पाटील (शहादा), यशवंत रोहिदास पाटील (शिरूड), रविराज रमाकांत पाटील (कलमाडी त.बो.), संजय विक्रम पाटील (सुलवाडे), शिवदास काशिनाथ चौधरी (बामखेडा त.त.), रविंद्र विठ्ठल चौधरी (धुरखेडा), शरद शिवदास- पटेल (मनरद), अरविंद जगन्नाथ पाटील (पाडळदा), यतेंद्र नरेंद्र पाटील (डामरखेडा), हिरालाल दत्तु पाटील (मोहिदे त.श.), नरेंद्रसिंह विजयसिंह गिरासे (जावदे त. ह.), अंबालाल काशिनाथ पाटील (ब्राम्हणपुरी), देविदास रुबाबसिंग पवार (पिंपलोद), सौ. रेखाबाई दिनानाथ पाटील (लांबोळा) व सौ. साधनाबाई सखाराम पाटील (बिलाडी त.सा.)