भुसावळलात वीज कर्मचाऱ्यास मारहाण

भुसावळ प्रतिनिधी l

शहरातील शिवाजी नगर कक्षामध्ये (ता. ३) रोजी रात्री टाऊन फिडर ब्रेक डाऊन झालेले होते. कर्मचाऱ्यांची रात्रीची ड्युटी सुरू होती त्यादरम्यान बरेचसे फ्यूज कॉल गेलेले असतात. त्या कारणा शिवाजी नगर कक्षेतील एस. के. ऑइल मिल या डीपीवरील फेज गेलेला होता. त्याठिकाणी वीज कंपनीचे दोन कर्मचारीपूर्वरत करण्यासाठी साईडवर होते.त्यांनी फ्यूज कॉल टाकला. त्याठिकाणी संबंधित अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी वीज कर्मचारी योगेश लासुरकर यांना मारहाण केली. त्या निषेधार्थ सर्व कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या बाहेर जमून सबंधितांवर गुन्हा दाखल केला.