वाळूची अवैध वाहतुक करणारी सहा वाहने जप्त

0

मोहाडी, भोकर, बांभोरी परीसरात तहसीलदारांची कारवाई

जळगाव – वाळूची अवैधरित्या वाहतुक करणारे चार ट्रक व दोन ट्रॅक्टर अशी सहा वाहने तहसीलदार वैशाली हिंगे व महसुलच्या पथकाने आज जप्त केली. या कारवाईमुळे वाळूची अवैध वाहतुक करणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
जिल्ह्यातील काही वाळू गटांचा ठेका संपुष्टात आला आहे. वाळू घाटांच्या लिलावासाठी नव्याने प्रक्रिया राबविली जात आहे. बंद असलेल्या वाळु घाटांच्या ठिकाणाहून वाळूची चोरटी वाहतुक केली जात आहे. आज तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यासह अनिरूध्द खेतमाळीस व शिरसोलीचे तलाठी भरत नन्नवरे यांच्या पथकाने मोहाडी, भोकर आणि बांभोरी परीसरात वाळुची अवैध वाहतुक करणारी सहा वाहने जप्त केली आहे. यात चार ट्रक व दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असुन ही वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे. या कारवाई वाळुची अवैध वाहतुक करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात वाळु वाहतुकदारांची गर्दी दिसून आली.