नवी दिल्ली- जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. प्रियसीला इम्प्रेस करण्यासाठी खोटे बोलत ४२० डॉलरच्या भावाने पुन्हा गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदी करण्याचे सांगितले. मात्र नंतर मस्क यांनी शेअर खरेदी केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा परिणाम म्हणून टेस्लाचे शेअर १४ टक्क्यांनी कमी झाले त्यामुळे मस्कच्या संपत्तीत ६०० कोटींनी घट झाली.