यावल वनविभागाच्या मोठया कार्यवाहीत गारबर्डी,सुकी धरण परिसरातील वनखंडावरील अतिक्रमण काढण्यात आलेत   

 परप्रांतीयांच्या वाढत्या घुसखोरीमुळे शेकडो मौल्यवान वृक्षांची बेशुमार कत्तल सातपुडा इतिहास जमा होण्याच्या मार्गावर

 यावल प्रतिनिधी l

सातपुडा पर्वताच्या जंगलात मोठया प्रमाणावर परप्रांतीय नागरीकांची घुसखोरी मोठया प्रमाणावर वाढली असुन , घुसखोर परप्रांतीयांकडुन वनजमीनीवर असलेली मौल्यवान वृक्षांची कत्तल करून वनजमीनीव अवैद्यरित्या अतिक्रमण करण्यात येत असल्याने येथील यावल वनविभाग जळगांव मधील यावल पुर्व वन परिक्षेत्रात दिगंबर पगार वनसंरक्षक धुळे (प्रादेशिक)वनवृत्त धुळे आणि जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव यांचे मार्गदर्शना खाली मध्यप्रदेश राज्याच्या सिमारेषा पासुन काही अंतरावर असलेल्या मौजे गारबर्डी सुकी धरण परिसरात राखीव वनखंड क्रमांक ३७ मध्ये अनधिकृत, अवैध असलेले वन जमिनीवरील अतिक्रमीत शेती क्षेत्र ०८ हेक्टर मध्ये खोल समतल चर खोदून आणि क्षेत्रात असलेले लाकडापासून बनविलेल्या ०४ झोपड्या काढून नष्ट करित वनजमिन अतिक्रमणमुक्त केले. सदरचे अतिक्रमणधारक ह्यांचे दुसऱ्या राखीव वनखंड मध्ये शेती चे पट्टे मिळालेले असुन सुध्दा सदरच्या राखीव वनखंड मध्ये शेती आणि झोपड्या बांधून अतिक्रमण करत असल्याचे गस्ती दरम्यान आढळून आले.पुर्ण चौकशीअंती अवैध अतिक्रमण असल्याचे आढळून आले होते. यावल वनविभागाच्या सातपुड्यात असे अतिक्रमण आढळून आल्यास जिल्हाधिकारी अमन मित्तल जळगांव आणि उपवनसंरक्षक जमीर शेख यावल वनविभाग जळगांव यांचे सुचना नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल जेणे करून सातपुडा मध्ये अवैध अतिक्रमनाला आळा बसेल. तसेच वन्यजीवांचे आश्रयस्थान मोकळे होईल.सातपुडातील जैव विविधता जतन होईल.या कामी सदर वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे कार्यवाही प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, अतुल तायडे, वनपाल फैजपूर , रविंद्र तायडे वनपाल डोंगरकठोरा आणि वनरक्षक सुपडू सपकाळे, युवराज मराठे,भैय्यासाहेब गायकवाड, गोवर्धन डोंगरे,तुकाराम लवटे, प्रकाश बारेला,जिवन नागरगोजे, सतिष वाघमारे,गणेश चौधरी, चंद्रकांत बोरसे, वनमजुर बलदार तडवी आणि एस आर पी वनतुकडीचे जवान आदी वनअधिकारी, वनकर्मचारी यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही चौकशी करित रीतसर कायदेशीर करण्यात आली आहे. यापुढे असेच वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.