जळगाव – एनर्जी स्वराजला प्रोत्साहन देण्यासाठी आयआयटी मुंबईतील ऊर्जाविज्ञान आणि इंजिनीअरिंग विभागातील प्राध्यापक डॉ. चेतन सिंह सोळंकी यांनी एनर्जी स्वराज यात्रा सुरू केली आहे. भोपाळ येथून २६ नोव्हेंबर २०२० पासून ही यात्रा सुरु केली आहे. ११ वर्ष घरी न जाता या यात्रेच्या माध्यमातून देशातील १०० कोटी नागरिकांना उर्जा साक्षर करणे तसेच १ कोटी कुटुंबाना उर्जा आत्मनिर्भर करण्याचा संकल्प डॉ. सोळंकी यांचा आहे. आज ही यात्रा जळगावात आली होती.या वेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
डॉ. सोळंकी म्हणाले की, विजेसाठी कोळसा, पेट्रोल-डिझेल व गॅसचा वापरामुळे मोठ्या प्रमाणात वातावरणात कार्बनचे उत्सर्जन होत आहे. हा कार्बन वातावरणात वर्षानुवर्ष राहत असल्याने हवामान अर्थात ऋतूचक्र विस्कळीत झाले आहे. या उर्जेच्या दुरपयोगामुळे पुथ्वीचे तापमान देखील वाढले आहे. कार्बन उत्सर्जन रोखून सोलार उर्जेचा वापर तो ही कमीत कमी न केल्यास पुथ्वी संकटात येण्याची शक्यता आहे.
हे संकट टाळण्याची जबाबदारी सर्वांची असल्याने प्रत्येक नागरिकाला उर्जा साक्षर होणे गरजेचे आहे. त्यासाठीच घराबाहेर राहून देशभरात एनर्जी स्वराज यात्रा सुरु केली आहे. उर्जेचा दुरपयोग टाळून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी गरजा मर्यादीत करणे व मर्यादीत गरजा लोकल करणे हे दोन नियम पाळावे लागणार आहे. तसेच टाळणे, मर्यादीत करणे व नविन तयार करणे या त्रिसुत्रीचा देखील वापर करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यासाठी १०० टक्के सोलार उर्जेवर यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. सध्या पु्थ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सियस पर्यंत वाढण्यासाठी आजपासून केवळ ७ वर्ष २२१ दिवस शिल्लक असल्याचेही ते म्हणाले