कार्डिफ: इंग्लंड आणि बांगलादेश संघात शनिवार वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत लढत झाली. दोन्ही संघांनी वर्ल्ड कपची सुरुवात विजयाने केली. मात्र, दुसऱ्या लढतीत दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागला आहे. तेव्हा विजयी मार्गावर परतण्याचा दोन्ही संघांकडून प्रयत्न झाल्याचे पाहायला मिळाले. सोफिया गार्डन्स, कार्डिफ येथे हा सामना खेळला गेला. बांगलादेशने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने दमदार सुरुवात केली. शेवटपर्यंत उत्कृष्ट खेळी करत इंग्लंड संघाने बांगलादेशसमोर ६ गडी गमवत ३८७ धावांचे तगडे आव्हान ठेवले. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी दमदार सुरुवात करून दिली. जेसन रॉयने १२१ चेंडूत १५३ धावांची धमाकेदार खेळी केली.
१६ वर्षापूर्वीचा रेकोर्ड मोडला
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. रॉय आणि बेअरस्टो या जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना १५ षटकांत शतकी भागीदारी केली. इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना हैराण केले. या जोडीने पहिल्या विकेटसाठी विक्रमी १२८ धावांची भागीदारी करताना १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी करत २००३ च्या वर्ल्ड कपचा विक्रम मोडला. वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी मार्व्हन अटापट्टू आणि सनथ जयसूर्या यांचा नाबाद १२६ धावांचा विक्रम मोडला.
भारताचा विक्रम मोडला
बांगलादेश विरुद्ध इंग्लंड संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी २०११ मध्ये भारताविरुद्ध ३३८ धावा चोपल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला. इंग्लंडने ६ बाद ३८६ धावा केल्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग ७ सामन्यांत ३०० पेक्षा अधिक धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला
पराभवाचा बदला घेतला
यजमान इंग्लंडने सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर १०४ धावांनी मात केली. दुसऱ्या लढतीत वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या इंग्लंडला पाकिस्तानकडून पराभवाचा धक्का बसला. बांगलादेशला दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावे लागले होते. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरले होते. बांगलादेशने इंग्लंडला वर्ल्ड कपमध्ये तीन पैकी दोन वेळा पराभवाचा धक्का दिला आहे. २०१५च्या वर्ल्ड कपमध्येही बांगलादेशने इंग्लंडला नमविले होते. या पराभवामुळे इंग्लंडला गटातूनच बाहेर पडावे लागले होते. या पराभवाचा बदला इंग्लंडने बंगलादेशला नमवून घेतला.
असे होते दोन्ही संघ
इंग्लंड: इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्ट्रो, जॉनी बेअरस्ट्रो, जॉस बटलर, बेन स्टॉक्स , ख्रिस वोक्स, लियाम प्लंकेट , जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड
बांग्लादेश: मशरफे मोर्तझा(कर्णधार), शाकीब अल हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिझूर रेहमान, मेहदी हसन, तमिम इक्बाल, सोमय्या सरकार , मुश्फीकुर रहीम, मोहम्मद मिथुन, मोहम्मदूल्ला, मुसद्देक हुसैन,