नवी दिल्ली- ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या सुजाता कुमार यांचे रविवारी रात्री निधन झाले. सुजाता यांना मेटास्टेटिक कॅन्सरने ग्रस्त होत्या.
सुजाता यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला असून आज सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सुजाता यांचा कर्करोग शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला होता. ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी कर्करोगमुक्त झाल्याचे चाहत्यांना सांगितले होते.
दरम्यान, गेली अनेक वर्ष चित्रपसृष्टीत घालविलेल्या सुजाता यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. या व्यतिरिक्त आनंद. एल.राय यांचा ‘रांझना’, करण जोहरचा ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटामध्येही झळकल्या आहेत. मात्र आजारपणामुळे त्यांनी हळूहळू चित्रपसृष्टीतून काढता पाय घेतला होता.