अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मियते भाकर बहिणाबाईनी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून समाजाला विवेकवादी संस्कार देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आजची तरुण पिढी, चित्रपट, टी. व्ही. मालिकाच्या प्रभावामुळे आणि पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे दिशाहीन होत आहे. हा चित्रपट टी.व्ही. मालिकाच्या प्रभावामुळे आणि पाश्चत्यांच्या अंधानुकरणामुळे आपल्या समाजात प्री वेडिंग शूट मोठ्या जोमाने फोफावत आहे. याचे दुष्परिणाम सुद्धा दिसायला लागलेले आहे. प्री वेडिंग शूट मध्ये चित्रीकरण केलेल्या आक्षेपाहार्य व्हिडीओमुळे अनेक परिवारात लग्न झाल्यावर सुद्धा ते) मोडल्याची पुष्कळ उदाहरणे निदर्शनास येत आहे.
आपल्या पूर्वज ऋषी-मुनींनी अत्यंत सूक्ष्म विचार करून विवाह संस्कार घालून दिला आहे. समाजव्यवस्थेसाठी एक पायाभूत घटक याने निर्माण होतो. संपूर्ण मानव समाजाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य या संस्काराशी निगडीत आहे. उत्तम चारित्र्यवान, सद्गुणी प्रजा निर्माण करणे आणि संतत्तीरुपाने अविछिन्न, अविनाशी राहण्याचा तो एक शस्त्रविहित मार्ग आहे. दोन आत्म्याचे मनोमिलन आहे, ज्यामुळे पती-पत्नी अद्वैत होतात. आध्यात्म आणि शिक्षण यांची सांगड घालून त्यांची कास धरून नवदापात्यांना मानसिक व भौतिक सुखाचा एवं विकासाचा मार्ग म्हणजे पवित्र लग्न असते.
इतका पवित्र संस्कार केवळ प्री वेडिंग शूटच्या नावाखाली नासविला जात आहे. त्यामुळे सामाज अधोगतीलाजात असल्याचे जाणवते. ज्या परिवारात प्री वेडिंग शूटमुळे पती-पत्नी विभक्त होतात, त्यांची इज्जत वेशीवर टांगल्यात होते, काही वेळी तर अश्या मुलीना ब्लाकमेल सुद्धा केले गेल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत. काय शूट करतात प्री वेडिंग शूट मध्ये तर नागडे होऊन धबधब्याखाली आंघोळ, मोटार सायकलवर उलट –
तोंड करून बसून मुके घेत रहाणे, एकमेकांना कावेत (बाहुपाशात घेऊन शरीराचे वाटेल त्या भागाचे चुंबन घेणे, बेडरूम मधले सीन. नुसता सेक्सी चित्रपट बनवतात. अहो ह्या सगळ्या खाजगी गोष्टी का म्हणून चव्हाट्यावर आणायच्या ? हे सगळ लग्नानंतर करायला मोकळीक आहेच की. मग का आधी करायचे असे वाईट चाळे? का आपल्या सर्वात प्राचीन व सभ्य संस्कृतीचा खेळ खंडोबा करता? आणि याचा परिणाम काय तर १५ दिवसात लग्न मोडलं. असे दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये.
खरे तर लग्नात आपण वराला नवरदेव म्हणजे श्री विष्णूचे रूप समजतो व नवरीला साक्षात देवी लक्ष्मीचे रूप समजतो आणि प्री वेडिंग शूटमुळे सगळ मुसळ केरात जात. ! त्याकरिता आमची सर्व समाज बांधव भगिनी यांना कळकळीची विनंती आहे की, लहानपणापासूनच आपल्या पाल्याना आध्यात्मासोबत संस्कारयुक्त शिक्षण द्या. त्यामुळे ते चारित्र्यवान, सुशील, जीज्ञासू विवेकी होतील.
उपरोक्त विवेचनाच्या अनुषंगाने आमची सर्व समाज बांधव भगिनी व सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना कळकळीची विंनती आहे की, त्यांनी आपल्या परिवारात, समाजात जेथे जेथे लग्न होऊ घातले आहे, किवा सोयरिक जुळत आहे, त्या त्या ठिकाणी प्री वेडिंग शूट मुळीच करणार नाही किंवा ती कायमस्वरूपी बंद करू अशी शपथ घ्यावी व त्याप्रमाणे कृति करीत राहावे.