पर्यावरण पुरक जीवन पध्दती अभियान

सध्या तापमानात होणारी वाढ, सतत होणारे वातावरणीय बदल, अवकाळी पाऊस, पुर, दुष्काळ अशा प्रकारच्या हवामान बदलांना आपण सामोरे जात आहोत या सर्वांचा मानवी जीवनावर प्रतिकुल परीणाम होत आहे. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात शेतीमध्ये सुध्दा हवामान बदलामुळे प्रतिकुल परीस्थीती उद्भवत आहे. आणि अशा लहरी हवामानाशी जुळवुन शेती करणे हेच आज शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे. या हवामान बदलाच्या दुष्परीणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे या उद्देशाने LIFE- Lifestyle for Environment Mission पर्यावरण पुरक जीवन पध्दती अभियान दि. २२ ते २८ मे २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ म्हणुन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक व कृषी विज्ञान केंद्र नाशिक यांचे सयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, नाशिक येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली.

 

त्यावेळी अभियानाचा उद्देश, सेंद्रिय शेती, शुन्य मशागत तंत्रज्ञान, या विषयी श्री. राजेंद्र निकम प्रकल्प संचालक आत्मा नाशिक तसेच BBF लागवड पध्दती मुलस्थानी जलसंधारण या विषयी श्री. राजाराम पाटील विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, नाशिक, बिजप्रक्रिया या विषयी श्री. प्रकाश कदम विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, नाशिक तसेच रिसोर्स फार्मर श्री. भास्कर मते, श्री. ज्ञानेश्वर रेवगडे यांनी नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती, इ. विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच श्री. गोकुळ अहिरे उविकृअ मालेगाव, श्री. नितिन ठोके, प्रमुख केव्हीके नाशिक, श्री. अमित पाटील, प्रमुख केव्हीके नाशिक, यांनी देखील उपस्थीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती वंदना शिंदे, प्रकल्प उपसंचालक आत्मा नाशिक यांनी केले. याप्रसंगी सर्व ATM / BTM व जिल्ह्यातुन १५६ शेतकरी उपस्थीत होते.

तसेच या अभियानाअंतर्गत दि. २२ ते २८ मे २०२३ या सप्ताह कालावधीत दि. २३ मे २०२३ रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा, २४ मे रोजी तालुकास्तरीय कार्यशाळा, २५ मे रोजी तालुकास्तरीय महिला शेतकरी मेळावा, २६ व २७ मे रोजी ग्रामस्तरावर क्षेत्रिय भेटी व किसान गोष्टी, प्रात्यक्षिक भेटी तसेच २८ मे रोजी अभियान सप्ताहाचा समारोप समारंभ घेण्यात येणार आहे. व या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना हवामान अनुकुल आधारीत कृषी तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांना कृषि विभागातील सर्व कर्मचारी व कृषि विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र सहभागी होणार आहेत.